सतर्क! झिका व्हायरसचा आणखी एक रूग्ण

नवी दिल्ली | गेली काही वर्षे जगभरात कोरोनानं थैमान घातलं होतं. कोरोनाच्या(Corona) संकटातून आता कुठं देश सावरत असतानाच आणखी एका नव्या व्हायरसनं तोंड वर काढलं आहे. त्यामुळं देशभरात चिंतेचं सावट पसरलं आहे.

आता कर्नाटक राज्यात एका पाच वर्षाच्या मुलीला झिकाची(Zika Virus) लागण झाली आहे. 5 डिसेंबर रोजी झिका व्हायरसच्या चाचणीसाठी तीन सॅंपल पुण्यामध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी एक रिपोर्ट पाॅजिटीव्ह आला आहे, अशी माहिती कर्नाटक राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिली आहे.

कर्नाटकातही झिकाचा रूग्ण आढळल्यानं तेथील जनतेमध्येही भिती पसरली आहे. त्यामुळं सर्वांनी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.

सरकार नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन योग्य ते पाऊल उचलेल. तसेच लवकरच नव्या गाईडलाईन जाहीर केल्या जातील, त्यामुळं नागरिकांनी भिती बाळगण्याची गरज नाही, असंही के. सुधाकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, झिका हा व्हायरस एडीस डासांमुळं पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. झिका संसर्गामुळं जीवही धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळं या व्हायरसची बाधा झाल्यास लवकरात लवकर उपचार घेणं आवश्यक आहे.

सांदेदुखी,पायदुखी, डोकेदुखी ही झिका व्हायरसची लक्षणं आहेत. कधीकधी व्हायरसची लागण झाल्यानंतर लवकर लक्षणही दिसत नाही.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More