बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

 हाय अलर्ट! ‘या’ जिल्ह्याला हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा; पुढचे 2 दिवस धोक्याचे

रायगड | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या पाऊस पडत आहे. तसंच यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. 2 दिवसांपासून सुरु झालेल्या पावसानं कालच जिल्ह्यात अनेक भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम अशी हजेरी लावली.

रायगड जिल्ह्यात मंगळवारपासून रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. मात्र, 10 आणि 11 जूनला जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हे 2 दिवस रायगडकरांसाठी धोकादायक आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. समुद्र, नदी, धरण वाहत्या पाण्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच समुद्र आणि खाडीकिनारी असलेल्या गावांना आणि नागरिकांना, प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीच्या काळात समुद्र, नदी, धरण या ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाचा जोर जास्त असतो. या ठिकाणी काहीजण पोहण्याचा आनंद लुटण्यास जातात. अशा वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिवृष्टी काळात विशेषतः तरुणांनी अशा ठिकाणी पोहण्यासाठी जाऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे.

दरम्यान, अतिवृष्टी आणि भरतीमुळे समुद्र, खाडी भागात किनाऱ्याला समुद्राचे पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. समुद्र, खाडी किनारील गावात पाणी शिरून पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क राहावं, अशा सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, अशा वेळी नागरिकांना तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. तर, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अथवा स्थानिक प्रशासनाकडं लगेचच मदत मागावी, असंही आवाहन निधी चौधरी यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

फायनलपुर्वी न्यूझीलंडला दुसरा मोठा धक्का; कर्णधार केन विल्यमसन दुखापतग्रस्त

श्रुती मराठेचा ‘पुण्याची मैना’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

आश्चर्यच! 24 हजार वर्षापुर्वीचा ‘तो’ जीव पुन्हा जिवंत झाला; जगभरातील शास्त्रज्ञही चकीत

सकारात्मक बातमी! देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यावर पसरली धुक्याची चादर, पाहा व्हिडिओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More