Alert For Google Chrome Users | आजकाल कोणतीही माहिती हवी असेल तर आपण लगेच गुगलवर जाऊन सर्च करतो. त्यामुळे इंटरनेट म्हणजे गुगल असं समीकरणच झालं आहे. मात्र, इंटरनेटचा वापर करताना तुमच्यावर हॅकर्स नजर ठेऊन असतात, याची माहिती वापरकर्त्यांना होत नाही. त्यातच अनेक युझरने सर्च करण्यासाठी गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करतात.
आता गुगल क्रोम ब्राउझर वापरकर्त्यांसाठी सरकारने मोठा इशारा दिला आहे. या ब्राउझरवर युझर्सचा खासगी डाटा हॅकर्सच्या हाती लागू शकतो.त्यामुळे युझर्सने सावध राहावं, असं सरकारने म्हटलं आहे.
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना धोका
गुगल क्रोमचा वापर करणाऱ्यांसाठी सरकारने इशारा जारी केला आहे.भारतीय कॉम्प्युटर रिस्पॉन्स टीम अर्थात सीईआरटी-इनने याबाबत सतर्क केलं आहे. देशातील लाखो गुगल क्रोम ब्राउझर युजर्सचे पीसी आणि लिनक्स सिस्टीम एका त्रुटीमुळे अडचणीत येऊ शकते.
यासंदर्भात 14 जूनरोजी सुरक्षा एजन्सीकडून महत्वाचा इशारा देण्यात आला. त्यात म्हटलं की, गुगल क्रोममध्ये ही त्रुटी V8 आणि फ्री Dawn, Browser UI, Dev Tools, Momory Allocator, Doenloads आदी अर्बिटरीजमध्ये दिसून आली आहे. अर्थातच गुगल क्रोम ब्राउझरमधील या त्रुटीमुळे युजर्सच्या पीसीचा (Alert For Google Chrome Users ) थेट अॅक्सेस हा हॅकर्सच्या हाती लागू शकतो.
गुगल क्रोम अपडेट करण्याचा महत्वाचा सल्ला
याद्वारे हॅकर्स युझर्सचा खासगी डाटा हॅक करू शकतात.त्यामुळे सीईआरटी-इनने वापरकर्त्यांना त्वरित त्यांचा क्रोम ब्राउझर अपडेट करायला सांगितले आहे. जर तुम्ही पीसीवर गुगल क्रोमचा वापर करत असाल तर क्रोमचं लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करावे.
नवीन व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी प्रथम तुमच्या पीसीवर गुगल क्रोम लाँच करा. त्यानंतर उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून सेटिंग्जमध्ये जा.येथे तुम्हाला About हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. मग Update Chrome वर क्लिक करून लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड (Alert For Google Chrome Users ) करावा.
News Title- Alert For Google Chrome Users
महत्त्वाच्या बातम्या –
“40 लाखांचा बाथटब, 12 लाखांचं कमोड..”; आलिशान पॅलेसमुळे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अडचणीत
सुजय विखेंना पराभव पचेना; घेतला मोठा निर्णय, निलेश लंकेंविरोधात…
‘आम्हाला भिडवत ठेवलं तर… ‘; मनोज जरांगेंचा थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा
बहुचर्चित ‘मुंज्या’चा थरार आता ओटीटीवर दिसणार; कधी आणि कुठे पाहणार?
“हिंमत असेल तर…”, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलं चॅलेंज