बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार

पुणे | कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी आज रविवारी (दि. 24) मुसळधार पावसाची(Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाड्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी या आठवड्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे .पुढील दोन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे.

महाराष्ट्रात आज(दि.24) काही ठिकाणी यलो अलर्ट( Yellow Alert)देण्यात आला आहे. चंद्रपूर, नाशिक, गोंदिया, भंडारा, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर अकोला, नागपूर,पालघर या ठिकाणी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे तेथील नागरीकांनी विशेषत: काळजी घ्यावी. सध्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. ओडिशा आणि परिसरात चक्राकार वादळांची शक्यता असून कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राज्यात शनिवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाने हजेरी लावली होती. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गेल्या 24 तासात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोली येथे 130 मिलिमीटर तर चंद्रपूर येथे 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दोन्ही जिल्हात काही ठिकाणी दमदार सरी कोसळल्या आहेत. घाटमाथ्यावर देखील काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त होता.

दरम्यान, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा बॅटींग सुरू केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांना काळज घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या:

येत्या तीन महिन्यात मध्यावधी निवडणुका लागणार?, रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ

सध्याच्या राजकारणावर नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शिवसेना फोडल्याचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंनाच – राज ठाकरे

“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार”

“संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More