बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ भागात अलर्ट जारी!

मुंबई | गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. राज्यभरात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं सांगितला आहे.

मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच रायगड, रत्नागिरीत जोरदार पाऊस पडणार आहे. तर पालघरमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघरला आज, मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुसळधार पावसानं अनेकांचं जनजीवन विस्कळीत केलं आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे नागरिकांना काही महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडण्यास इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही भागात तुरळक पाऊस तसेच विदर्भामध्येही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हवामान खात्यानं सतर्क राहण्यास सागितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात ‘हे’ मोठे बदल, आयएनसीने केली मोठी घोषणा

रणवीर-दीपिका झाले गुंठामंत्री! मुंबईमध्ये खरेदी केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची जमीन

”ही’ गोष्ट करून मोदींनी दाखवून दिलं, ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’”

“शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पंजाबला त्रास देऊ नये”

‘ …तर कोरोनाची लसही ठरु शकते निरुपयोगी’; WHOच्या माहितीनं जगाचं टेन्शन वाढलं!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More