थंडीचा जोर वाढल्यानं ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | जानेवारी महिन्याचा पंधरवडा उलटला तरी देशात अजूनही काही ठिकाणी थंडीची(Winter Season) लाट कायम आहे. उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आलीय. याचा परिणाम आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर होताना दिसत आहे.

उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्याचा परिणाम अनेक राज्यांवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं(Meteorological Department) वर्तविला आहे. परिणामी महाराष्ट्रात मुंबई आणि संपूर्ण किनारी भागात कडाक्याची थंडी पडणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातीलही काही भागांत 18 जानेवारी पर्यंत थंडी असणार आहे. त्यामुळं कोकणातील थंडी अजून 2 दिवस कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळं कोकणात पुढील 48 तास थंडीचा अलर्ट देण्यात आला आहे.

दोन-तीन दिवसानंतर किमान तापमानात वाढ होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळं दोन दिवसानंतर थंडीचा जोर कमी होऊ शकतो.

दरम्यान, उत्तरेकडील भागातील कडाक्याची थंडी, दाट धुके आणि ढगाळ वातावरण याचा परिणाम किनारी भागावर होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-