मुंबई | अचानक सुरु झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. होळी पासून चार दिवस सुरु असलेल्या पावसाने मराठवाडा, विदर्भासह कोकणमध्ये हजेरी लावली.
पिकांचं मोठ नुकसान झालं असून शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला. सध्या औरंगाबाद, जालना, परभणीसह विदर्भातील वाशिम, नंदुरबार या भागात सध्या पावसाचं वातावरण दिसत नाहीये. मात्र पुढील चार ते पाच दिवस राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्याने अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 13 आणि 14 मार्चला छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटींसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी. हा अवकाळी पाऊस 16 मार्च पर्यंत असण्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणून आताच तुमच्या शेतातील फळे काढून ठेवावीत, असाा इशारा देण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या-
अत्यंत धक्कादायक घटना! जादूटोण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं
“शरद पवारांनी महाविकास आघाडी सोडून मोदींसोबत काम करावं”
सोमय्यांवर झालं बूमरँग; मुंबई उच्च न्यायालयाने दिला तगडा झटका
पोरीच्या धाडसाला सलाम; आजीसाठी 10 वर्षांची नात चोरासोबत भिडली, पाहा व्हिडीओ