मासिक पाळीमध्ये ब्रेस्ट पेन होत असेल तर आताच व्हा सावध!

मुंबई | प्रत्येक मुलगी वयात आल्यावर तिला मासिक पाळी ही येतच असते. मासिक पाळी दरम्यान आपल्या शरीरात बरेच बदल होत असतात. तसेच मासिक पाळीदरम्यान ओटी पोट दुखणं, कंबर दुखणं, हात पाय दुखणं असा त्रास महिलांना होता. तसेच काहीजणींचे स्तन हळवे होऊन ते दुःखतात म्हणजेच ब्रेस्ट पेन होतो. यामध्ये काही महिलांना ब्रेस्ट पेनचा प्रचंड त्रास होत असल्याचं समोर आलं.

मासिक पाळी येण्याआधी बऱ्याच महिलांना ब्रेस्ट पेन होतं. कोणाला कमी प्रमाणात होतो तर काही जणींना याचा जास्त त्रास होतो. या मागचं कारण म्हणजे ज्यावेळेस मासिक पाळी येते त्यावेळेस आपल्या शरीराला ती तयाक करत असते. मासिक पाळी येण्याआधी शरीरातून प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे दोन हार्मोन्स स्राव होऊ लागतात.

यावेळेस यामध्ये असलेल्या संप्रेरकांमधील चढ-उतार हे अशा लक्षणांचे कारण आहेत, म्हणजेच याला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असे म्हणतात. मासिक पाळीच्या दोन ते तीन दिवसांत हा त्रास कमी होतो. आणि या वेळेस डाॅक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

ब्रेस्टमध्ये किंवा काखेत गुठळ्या, सूज किंवा वेदना होत असल्यास त्याकडे दुलर्लक्ष करू नका. काही वेळेस स्तनांमध्ये अचानक बदल, लालसरपणा, खाज सुटणे, स्तनाग्रांना इंडेंटेशन इत्यादी जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर योग्य तो उपचार घ्या.

थोडक्यात बातम्या-

‘माझा चांगला काळ फक्त…’; सत्यजित तांबेंचं पोस्टर व्हायरल

नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील आल्या समोर, म्हणतात…

ज्याच्या पराभवाची चर्चा होतेय तो सिकंदर कोण?

सर्वात मोठी बातमी! काँग्रेस हायकमांडचा सत्यजित तांबेंना झटका

“मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचं मला माहित नाही”