बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आलिया आणि रणवीरचा ‘हा’ चित्रपट होतोय रिलीज, करणने पुन्हा बनवली प्रेम कहाणी

मुंबई | सुपरहिट हिंदी सिनेमा गली बाॅय नंतर निर्माता करण जोहरने पुन्हा एकदा अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंगच्या जोडीला प्रेक्षकांसमोर आणलं आहे. रणवीर सिंग आणि आलियाचा राॅकी और राणी की प्रेम कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड रंगली आहे.

हा चित्रपट 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल, असं करणने म्हटलं आङे. स्वतः करण जोहरने काल जाहीर केले होते की, तो तब्बल 5 वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शनाकडे परत येत आहे. ‘कुछ कुछ होता है’ ने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा करण जोहर आज देशातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता झाला आहे.

आपल्या बॉलिवूड कारकिर्दीबद्दल बोलताना करण जोहरने सांगितले होते की, त्याने धर्मा प्रॉडक्शन, धर्माटीक, धर्मा कॉर्नरस्टोन कंपनी सोबत धर्मा 2.0 कसे लाँच केले आहे. करणने आज आपल्या कंपन्यांना देशातील सर्वात मोठी फिल्म पॉवरहाऊस प्रोडक्शन कंपनी बनवली आहे. अलीकडेच त्याने डीसीए ही टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली.

दरम्यान, 2015मध्ये करणने रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ज्यांना प्रेमकथा आवडतात त्यांच्यासाठी हा चित्रपट अतिशय खास ठरला होता.
थोडक्यात बातम्या-

“…पण हे मुंबई मॉडेल नाही, तर मृत्यूचं मॉडेल”

“12 आमदारांचं निलंबन हा लोकशाहीचा खून”

अधिवेशनादरम्यान आजही सभागृहात राडा; आमदार रवी राणांनी विधानसभेतील ‘राजदंड’ पळवला

हेलिकॉप्टरमधून नवरदेवासोबत खासदार अमोल कोल्हेंनी केली दमदार एन्ट्री!

‘भास्कर जाधव यांना संरक्षण देणार’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत ग्वाही

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More