मनोरंजन

2019 मधील सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरली ‘ही’ हॉट अभिनेत्री

मुंबई | स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट सध्या यशाच्या शिखरावर आहे. तिनं 2019 साली अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. 2019 मधील सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरण्याचा मानही तिला मिळाला आहे.

आलियासोबतच अभिनेत्री दिपिका पादुकोन  संपूर्ण दशकातील सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरली आहे. बुधवारी लंडमनध्ये पार पडलेल्या एका ऑनलाईन स्पर्धेत त्यांना या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

तुम्ही बाहेरुन कसे आहात यावर तुमचं सौंदर्य ठरत नसतं. तुम्ही माणूस म्हणून कसे आहात यावर तुमचं सौंदर्य ठरतं. वृद्धत्व आल्यानंतर बाहेरील सोंदर्य टिकत नाही. मात्र, तुम्ही मनाने सुंदर असाल तर ते कायम असतं, अशी प्रतिक्रिया आलियाने यावर दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील इस्टर्न आय या वृत्तपत्राने आशियातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या पुरुषांची यादी जाहीर केली होती. यात अभिनेता हृतिक रोशन हा आशियातील सर्वात सेक्सी पुरुष ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या