बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्वारंटाईनचे नियम तोडून आलिया भट्ट पोहोचली दिल्लीला; आता मुंबईत परतताच…

मुंबई | बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करन जोहर (Karan Johar) याने काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सहभागी झालेल्या काही अभिनेत्रींना कोरोनाची (Corona) लागण झाली होती. याच पार्टीत अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) देखील सामील झाली होती.

आलिया भट्ट हीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता पण तिला क्वारंटाईन होण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र, क्वारंटाईनचे नियम ढाब्यावर बसवत आलिया दिल्लीसाठी रवाना झाली. बॉलिवूड दिग्दर्शक आर्यन मुखर्जीसोबत आलिया दिल्लीत गुरूद्वारमध्ये दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी तिच्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले.

आलिया भट्ट चार्टर विमानाने आज दिल्लीहून मुंबईला परतणार आहे. आलिया मुंबईत दाखल होताच तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. आलिया मुंबईत येताच महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आलियावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने करण जोहरने त्याच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीनंतर अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर आणि सीमा खान यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे सतर्कता म्हणून आलियाला देखील क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आलं होतं. पण नियमांचे उल्लंघन केल्याने आलियावर कारवाईची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

टीम इंडियात नक्की चाललंय का?, सौरव गांगुलीचा दावा कोहलीने फेटाळला

हरभजन सिंग काॅंग्रेसमध्ये जाणार का?; सिद्धूंच्या ट्विटची एकच चर्चा

Omicron नाही तर ‘या’ व्हेरियंटचा अधिक धोका, धक्कादायक माहिती समोर

“जोपर्यंत ‘तो’ मंत्री जेलमध्ये जात नाही तोपर्यंत…”, राहुल गांधी आक्रमक

ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के! निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ मोठे संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More