Alia Bhatt | बॉलीवुडमध्ये अनेक अभिनेत्री या डीपफेकच्या शिकार झाल्या आहेत. अभिनेत्री कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, रश्मिका मंदाना, नोरा फतेही यांचे डीपफेक फोटो आणि व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता आलिया भट्टचा पुन्हा असाच एक डीप व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जातोय.
व्हायरल होणारा व्हिडिओ हा आतापर्यंत 20 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. AI च्या मदतीने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप आणि चिंता व्यक्त केली आहे.
आलिया भट्टचा फेक व्हिडिओ व्हायरल
यात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे.व्हिडीओमध्ये आलिया तयार होताना दिसत आहे. हे सगळं बघून नेटकरी त्यावर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. ‘पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला वाटलं आलिया भट्ट आहे. नीट पाहिल्यानंतर आलिया नसल्याचं कळलं…’, असं एक नेटकरी म्हणाला.
तर, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘AI प्रचंड भयानक आहे.’अशा प्रतिक्रिया नेटकरी नोंदवत आहेत. काही जण हे सगळं काही खूप भयानक असल्याचं म्हणत आहेत. तर, काही जण हे चुकीचे असून त्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी करत आहेत.
View this post on Instagram
नेटकरी व्हिडिओ बघून संतापले
यापूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत देखील तक्रार दाखल केली होती. आता आलिया भट्टचा (Alia Bhatt)असा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, आलिया भट्टच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्या ‘जिगरा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचे पोस्टर देखील जारी करण्यात आले आहे. हा सिनेमा 11 ऑक्टोबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
News Title : Alia Bhatt Deepfake Video Viral
महत्त्वाच्या बातम्या-
“मला मित्रासोबत झोपवलं आणि…”, करिश्मा कपूरच्या वक्तव्याने बॉलिवूड हादरलं
“भुजबळांची भाजपसोबत जाण्याची इच्छाच नव्हती, पण..”; ‘या’ नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट
मोठी बातमी! भाजप नेत्याच्या घरात उभी फूट; वहिनींच्या मतदारसंघावर दिराचा दावा
‘दारु पीऊन तो धिंगाणा आणि शिवीगाळ…’, Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट
समृद्धी महामार्गाची वर्षभरातच दयनीय अवस्था, पुलाला मोठं भगदाड पडल्याने 3 दिवसांत 4 अपघात