बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Koffee With Karan 7: दीपिकाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे आलिया ट्रोल

मुंबई | चित्रपट निर्माता करण जोहरचा काॅफी विथ करण हा टॉक शो जितका लोकप्रिय आहे तितकाच वादग्रस्त देखील आहे. आतापर्यंत कॉफी विथ करणच्या 6 यशस्वी सिझन नंतर या शोचा 7वा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

7व्या सिझनचा पहिला एपिसोड काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून या भागात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली. रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटात देखील आलिया व रणवीरची जोडी पाहायला मिळणार आहे.मात्र, तत्पूर्वी करण जोहरने या शोमध्ये विचारलेल्या काही प्रश्नाच्या उत्तरांमुळे आलिया भट्ट सध्या चर्चत आहे.

रणवीर म्हणाला की आलियाची भाषा दीपिकापेक्षा स्पष्ट आहे. मात्र शारिरीकदृष्ट्या दीपिका सुंदर आहे. यावर आलिया म्हणाली की संजय लिला भन्साळी यांनी दीपिका सोबत 3 चित्रपट केले आहेत. मात्र, त्यांनी माझ्यासोबत 4 चित्रपट करण्याचे आश्वासन दिले आहे. आणि रणवीर सिंगने जे वक्तव्य केलं आहे ते दीपिकाच्या उंचीवरून केलं आहे, असं आलिया म्हणाली. यानंतर दीपिकाच्या चाहत्याकडून आलियाला ट्रोल करण्यात येत आहे. आलिया दीपिकाशी तुलना करत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. तर ही गोष्ट दीपिकाच्या चाहत्यांना अजिबात रूचलेली नाही.

दरम्यान, रणवीर आणि आलियासोबतचा कॉफी विथ करणचा हा एपिसोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर आलियाने काही दिवसांपूर्वी गुड न्यूज शेअर केल्यानंतर आता दीपिकाही लवकरच गोड बातमी देणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

थोडक्यात बातम्या

श्रीलंकेत पुन्हा एकदा जाळपोळ, संतप्त नागरिक रस्त्यावर

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा, नारायण मुर्तींसोबत आहे खास नातं

“शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीसांनी दाढी-मिश्यासुद्धा लावल्या असतील”

भाजप नेत्याचा मोठा दावा, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोटात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More