बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आलिया भट्टने केला हिंदू संस्कृतीचा अपमान??? मुंबईत आलियाविरूद्ध तक्रार दाखल

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काही जाहिराती वादग्रस्त ठरत आहेत. बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. अशातच आता सध्या आलिया अडचणींत सापडली असल्यामुळे चर्चेत आली आहे. आलिया विरोधात मुंबईत तक्रार दाखल झाली आहे.

आलियाची नुकतीच एक जाहिरात प्रदर्शित झाली. ती ‘मान्यवर’च्या प्रसिद्ध कपड्यांच्या जाहिरातीत झळकली. या जाहिरातीबद्दल बराच गोंधळ उडाला आहे. या जाहिरातीत हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे आता आलियाविरुद्ध मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबईच्या लोकक्रांती सामाजिक संघटनेने मान्यवर हा ब्रँड आणि आलिया भटविरोधात तक्रार दाखल केली आहे. संघटनेचे अध्यक्ष व पेशाने वकील असलेले विजेंद्र जाबराने यांनी संबंधित जाहिरात हिंदूविरोधी असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, त्यामुळे आता या जाहिरातीमुळे आलियाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. काहींनी या जाहिरातीचं कौतूक केलं मात्र काहींच्या भावनाही या जाहिरातीमुळे दुखावल्या गेल्या. वादात सापडलेल्या या जाहिरातीमुळे आलियाही वादात सापडली आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या – 

कडक सॅल्यूट! एकही सुट्टी न घेता 8 महिन्यात केलं तब्बल 61 हजार जणांचं लसीकरण

“सरकारने एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं”

“राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही”

मद्यप्रेमींचा हिरमुड! ‘या’ ठिकाणी तब्बल 45 दिवस दारूची दुकानं बंद राहणार

शिवलीला पाटील बिग बॅासमधून बाहेर, समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More