बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आलिया भट्टच्या आईचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाल्या…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माते महेश भट्ट यांची पत्नी सोनी राझदान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. बऱ्याचदा त्या सामाजिक मुद्द्यावर सोशल मीडियावर आपलं मत मांडतात. त्यामुळे त्या अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. नुकताच सोनी राझदान यांनी ट्विटरवर कोरोना लसीबद्दल एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्या महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंञ्यांना प्रश्न विचारत आहे.

सोनी राझदान यांनी त्यांच्या ट्विटमध्ये महाराष्टाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे. 16 ते 40 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस सगळ्यात आधी दिली गेली पाहिजे. कारण या वयोगटातील जास्त लोक कामाला आणि इतर अन्य कारणांसाठी बाहेर जातात. तसेच बार, नाईटक्लब इत्यादी ठिकाणी जातात. मला कळत नाही की आधी या वयोगटातील लोकांना का कोरोना लस दिली जात नाही?, असं सोनी राझदान यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सोनी राझदान यांनी केलेल्या या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज लावायला सुरूवात केली आहे. अलीकडेच रणबीर कपूरला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सोनी राझदान यांना काळजी वाटणं सहाजिक आहे, कारण त्यांना आपल्या होणाऱ्या जावयाची चिंता वाटत असेल, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसात अनेक बॉलिवूडच्या कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. कार्तिक आर्यन, तारा सुतारिया, मनोज बाजपेयी, आशिष विद्यार्थी, संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच नुकतंच बॉलिवूड अभिनेता अमिर खान आणि आर माधवन यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 
‘नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?’; मनसे आमदार राजू पाटील यांचा संतप्त सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आले, तरी…- चंद्रकांत पाटील

महावितरणाच्या अधिकाऱ्याला चप्पलीचा हार घालून खुर्चीला बांधलं; भाजप आमदाराचा कारनामा

“लोक सांगूनही ऐकत नाहीत, मग लॉकडाऊन हाच पर्याय”

पुण्यातील फॅशन स्ट्रीटला लागलेल्या भीषण आगीत 800 दुकानं जळून खाक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More