मनोरंजन

आलिया म्हणते…रणबीरसोबतचा ‘तो’ दिवस कधीही विसरु शकत नाही

मुंबई | बाॅलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. एका कार्यक्रमात बोलताना आलियाने रणवीर विषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

2019 मधील त्यांच्या दोघांमधील एका खास दिवसाचीही तिने आठवण काढली आहे. 2019 साली मला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, त्याच वेळेस रणबीरलाही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे आम्ही दोघेही पुरस्कार घेण्यासाठी एकत्र मंचावर होतो, असं आलियाने सांगितलं आहे.

रणबीर आणि मी एकत्र पुरस्कार घेतोय हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. मी कधीही हा दिवस विसरु शकणार नाही, असं आलिया म्हणाली आहे.

दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या अफेअरच्या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. मात्र या दोघांमध्ये काय घडतंय हे जाणून घेण्याचा चाहते नेहमी प्रयत्न करतात.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या