मुंबई। इंडस्ट्रीमध्ये 70 80 चं दशक गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून नीतू कपूर यांना(Neetu Kapoor) ओळखलं जातं. नीतू यांनी त्यांच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं लाखो लोकांच्या मनात घर केलं.
अभिनेत्री नीतू या आज 8 जुलै रोजी 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनेक सेलेब्रिटीने सोशल मीडियावर पोस्ट करत नीतूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नीतू कपूरची सून आलीया भट्टने (Aalia Bhatt) देखील तिच्या इंस्टाग्राम अकॉऊंटवर आपल्या लाडक्या सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आता कपूर घराण्यात लवकरच लहान चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. काही दिवसापूर्वी अभिनेत्री आलीय भट्ट (Aalia Bhatt) आणि रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) त्यांची आई बाबा होण्याची बातमी दिली.
आलियाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की,”माझ्या प्रेमळ सासूबाई, मैत्रीण आणि होणाऱ्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”. सोबतच तिने तिच्या हळदीमधला दोघींचा एक फोटो शेर केला. या शिवाय नीतू यांनी देखील आलियाच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, “तुझ्यावर खूप प्रेम आहे” आणि तिची इंट्सग्राम स्टोरीही शेअर केली आहे. नीतुने त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ शेर केले. त्यांच्या या पोस्टमध्ये कपूर कुटुंबातील सर्व सदस्य दिसत आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘…म्हणून आमदार शिवसेनेतून भाजपात गेले’, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
‘घरात घुसून मारलं होतं ना?’, कंगना रनौतने पुन्हा करण जोहरला डिवचलं
‘उद्धवजी अजूनही वेळ गेलेली नाही’, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंना साद
ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट राज्यात सक्रीय, ‘इतके’ रूग्ण आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ
‘…तर नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Comments are closed.