मुंबई | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांच्या दौऱ्याची देशभरात चर्चा होत आहे. तसेच ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प देखील त्यांच्यासोबत या दौऱ्यावर आहेत. मेलेनिया ट्रम्प यांच्या सौंदर्याबाबत देशभर चर्चा होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, पण सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या पत्नीने, म्हणजेच मेलानिआ ट्रम्प यांनी. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया या लग्नाअगोदर मॉडेलिंग करायच्या. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प मेलानिया यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा देखील त्या मॉडेलिंग करत होत्या.
मेलानिया आणि ट्रम्प यांच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली आहेत. मात्र, अजूनही मेलानिया एवढ्या सुंदर कशा दिसतात? हा प्रश्न जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामागील पहिलं आणि महत्त्वाचं कारण हे त्यांचं डाएट आहे. मेलानिया या दिवसाला 7 फळं खातात. याशिवाय त्या दररोज फळांचा ज्यूस पितात.
मेलानिया सौंदर्यासाठी तुफान पैसे खर्च करतात. त्यांच्या मेकअपसाठी व्हाईट हाऊसमध्ये मेकअप आर्टिस्ट आहेत. मेलानिया फक्त मेकअपसाठीच नाही तर कपड्यांसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात.
मेलानिया यांच्या एकाही ड्रेसची किंमत 3 लाखांपेक्षा कमी नाही. व्हाईट हाऊसच्या गार्डनमध्ये फिरण्यासाठी त्यांनी 6 लाखांचा ड्रेस खरेदी केला होता.
Comments are closed.