बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ‘या’ तारखेपासुन सरसकट लस मिळणार; केंद्राची मोठी घोषणा

नवी दिल्ली | केंद्र सरकारतर्फे 1 मार्चपासून देशातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं. त्यानुसार 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच काही व्याधींनी त्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आज केंद्रातील कॅबिनेटच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन लसीच्या बाबतीत मोठी घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट लस देण्यात येईल, असं पत्रकार परिषदेत जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

भारतात कोरोना लसीचा डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. तसेच आज झालेल्या निर्णयानुसार 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला त्यांनी लसीकरणासाठी नावाची नोंदणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात येईल असं स्पष्ट केलं.

देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता लसीकरणाचा वेग वाढवला आहे. त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याने सुरुवातीला त्यांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली. परंतु, आता 45 वर्षांवरील सर्वच नागरिकांना नोंदणी केल्यानंतर सरसकट लस देण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

हरियाणातील धक्कादायक प्रकार! भर सभेत महिला IAS ऑफिसरची काढली छेड 

IPS रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप, पाहा व्हिडिओ

‘शरद पवारांच्या पाठिंब्याचा आदरच, पण…’; नवनीत राणांचं रूपाली चाकणकरांना जोरदार प्रत्युत्तर

“होय, मी 15 ते 28 फेब्रुवारीदरम्यान मुंबईत होम क्वारंटाईन होतो”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More