देश

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकजूट होऊन लढण्याची गरज- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | आज लोक दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी खुलेपणाने पुढे येत आहेत, तो एक जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. या वातावरणात जगातील सर्व देशांनी, सर्व देशांच्या सरकारांनी, सर्व धर्मांच्या लोकांनी एकजूट होऊन दहशतवादाविरोधात लढण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने एका कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाचे समर्थन करणारी भूमिका घेणाऱ्यांना सुनावलं आहे.

पुलवामा हल्ला आणि वीर जवान शहीद झाले असताना काही लोक या दुःखात सहभागी नव्हते. हे लोक त्यातही राजकीय स्वार्थ शोधत होते, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावलाय.

दरम्यान, देशहितासाठी, देशसुरक्षेच्या हितासाठी, जवानांचे मनोबल कमी व्हावं यासाठी तुम्ही राजकारण करू नका, असं मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही”

“तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल”

“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”

“पराभव दिसू लागला की भाजप पाकिस्तानच्या आश्रयाला जातं”

तुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या