बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान मोदींनीही गुंतवणूक केलेली पोस्टाची ‘ही’ भन्नाट योजना आहे तरी काय?

नवी दिल्ली | सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी गुंतवणूक करताना माणुस 10 वेळा विचार करतो. अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या योजना गुंतवणुकदारांना उत्तम रिटर्न्स देतात. पण आपल्या देशात गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह पर्याय म्हणून पोस्टाच्या योजनांचा विचार केला जातो. जर तुम्ही गुंतवणूक करायच्या विचारात असाल तर पोस्टाची ही योजना तुमच्यासाठीच आहे. ज्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुंतवणूक केली आहे.

पोस्टाच्या या योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुंतवणुक केली असल्याचं म्हटलं जात आहे. पोस्टाच्या जीवन विमा आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूक केली आहे. तर समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी जून 2020 मध्ये 8 लाख 43 हजार 124 रूपये गुंतवले असून त्यांनी जीवन विम्यासाठी 1 लाख 50 हजार 957 रूपये प्रीमीयम जमा केला होता.

मोदींनी गुंतवणूक केलेली पोस्टाची ही योजना छोट्या बचत योजनेचा भाग आहे. सरकारी योजनेत आणि सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट एक चांगला पर्याय आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा किमान लॉक इन कालावधी हा पाच पर्षांचा असतो आणि पाच वर्षांच्या गुंतवणुकीनंतर तुम्ही ती रक्कम परत काढू शकता. यामध्ये तुम्ही 100च्या पटीत गुंतवणूक करू शकता तर किमान गुंतवणूक रक्कम ही 1 हजार इतकी आहे.

आयकर कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करून सुट मिळेल तर करपात्र उत्पन्नाच्या बाबतीत एकुण उत्पन्नातून रक्कम वजा केली जाते. या योजनेत 3 प्रकारे गुंतवणूक करता येते. सिंगल प्रकारात तुम्ही स्वत:साठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठीही गुंतवणूक करू शकता. जॉइंट ए प्रकारात दोन लोक एकत्र गुंतवणूक करू शकतात तर जॉइंट-बी प्रकारात दोन लोक एकत्र गुंतवणूक करतात पण मॅच्युरिटीवर एकाच गुंतवणुकदाराला पैसे मिळतात.

थोडक्यात बातम्या-

भागवत कराडांच्या ‘कर्तव्यदक्षतेच्या प्रवासाचं’ पंतप्रधानांनीही केलं कौतुक

“गांधीजीची इच्छा होती की भगत सिंग यांना फाशी मिळावी”

“कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू”

पुणेकरांचा रिक्षा प्रवास येत्या 22 तारखेपासून महागणार, काय असणार नवे दर?

“देवेंद्रजी उघडा डोळे बघा नीट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More