मोठी बातमी! फडणवीसांची रणनिती यशस्वी, महाविकास आघाडीचे मतं फोडण्यात भाजपला यश
मुंबई | विधानपरिषद निवडणुकीचे निकाल समोर आले असून भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे प्रसाद लाड व काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यात लढत पाहायला मिळत होती.
राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसमध्ये मात्र चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे सचिन अहिर व अमिषा पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे व रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार महाविकास आघाडीचे 21 मतं फोडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची रणनिती यशस्वी ठरली का अशा चर्चा आता रंगत आहेत. भाजपचे प्रसाद लाड, काँग्रेसचे भाई जगताप व चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरसीची लढत पाहायला मिळत आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे विधानपरिषदेची दहावी जागा कोणाला मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनिया गांधींना ईडीकडून समन्स जारी
केंद्रीय निवडणूक आयोगाचाही काँग्रेसला दणका, मतमोजणीला सुरूवात
“कोणी कितीही पावसात भिजलं तरी निवडून येणार नाही”
भाजपच्या ‘या’ दोन मतांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव
‘राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर…’, दीपाली सय्यद यांची तुफान टोलेबाजी
Comments are closed.