बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धवजींना एकच सांगू इच्छितोे की, संजय राऊत तुम्हाला घेऊन एकदिवशी नक्कीच डूबणार”

मुंबई |  शिवसेना भवनमध्ये खासदार संजय राऊत यांनी वादळी पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक गंभीर आरोप केले होते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेना नेत्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वातावरण चांगलचं तापलं. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना जोरदार टीका केली आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, संजय राऊतजी, असा थयथयाट करून काहीही होणार नाही. तुम्ही देवेंद्रजींची काळजी  करू नका. असं पाटील यांनी म्हटलंय. तसेच मी उद्धवजींना एकच सांगू इच्छितोे की, हे संजय राऊत तुम्हाला घेवून एकदिवशी नक्कीच डूबणार, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या पेरोलवर राहुन त्यांचाच अजेंडा चालवण्याचे काम संजय राऊत करत आहेत. मोदीजींच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी कटकारस्थान रचले, त्यांना आता कळून चुकलं की, आपण सुर्यावर थुंकत होतो. पंजाबमध्ये त्यांचा ताफा अडवण्याचं काम असो किंवा वर्षभर चालु ठेवलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन असो, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या यांना अटक करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यावरून चंद्रकात पाटील यांनी  संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या बाबतीत काही मुद्दे उपस्थित केले होते. मग त्यासाठी जाऊन न्यायालयात जाऊत स्वत:ला निर्दोष सिद्ध करता येत. त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक गोष्ट दिसून आली की, यांना भीती आहे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

एका रात्रीचे किती घेतेस विचारणाऱ्याला मुनमुन दत्ताने झाप झापलं, म्हणाली…

पॅन कार्ड हरवताच केवीन पीटरसनची मदतीसाठी पंतप्रधान मोदींकडे धाव, म्हणाला…

‘या’ कारणामुळे बप्पी लाहिरी घालायचे सोन्याचे दागिने!

‘पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या देवेंद्रजी सहज खायचे’, अमृता फडणवीसांचा खुलासा

अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, ताब्यात घेतलेल्या तरूणाने केला खळबळजनक दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More