मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत शिवसेनेला मोठा झटका दिला. 35 समर्थक आमदारांसोबत एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं.
एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसोबत सुरत येथील ले मेरेडिन हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, या सर्व आमदारांना आता सुरत मधून हालवण्यात येत असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना सुरत येथुन आसामच्या गुवाहाटी येथे नेण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना मध्यरात्री एअरलिफ्ट केलं जाणार आहे.
दरम्यान, शिंदेंच्या बंडखोरीमुळे मुंबईत असणाऱ्या शिवसेनेच्या उरलेल्या आमदारांना हॉटेल सेंट रेगिसला नेण्यात येणार आहे. तर त्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी युवासेनेकडे असणार आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिजीत बिचुकलेंसह 20 जणांच्या संपर्कात”
‘परत जाऊ नका आता’, मराठी अभिनेत्याचा एकनाथ शिंदेंना सल्ला
“आज बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”
एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार, सुरतमधून सर्वात मोठी अपडेट समोर
“…त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांची भावना समजून घेऊ शकतो”
Comments are closed.