Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, पालिकेच्या शाळा आता ‘या’ नावाने ओळखल्या जाणार

 मुंबई | मुंबई महापालिकेच्या बजेटवेळी शाळांबाबत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांच्या नामंतर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या शाळा मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखल्या जाणार आहेत.

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये शिक्षण विभागासाठी 2945 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना साबण आणि सॅनिटायझर देण्यात येणार आहे.

खासगी शाळांच्या अनुदानासाठी 380 कोटी तर शालेय वस्तूंचा मोफत पुरवठ्यासाठी 88 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बजेट सादर करताना पालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी चुकुन पाण्याऐवजी सॅनिटायझर प्यायलं.

दरम्यान, मुंबई महापालिकेने मुंबईतील शांळांच्या नामंतराच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्ष काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी माझी सत्याची बाजू मांडली मात्र तरीही मला धमक्यांचे फोन येतात”

“आम्ही शेतकरी आहोत, गरज पडली तर लाथ मारु तेथे पाणी काढू”

“शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?”

‘उद्या सकाळी शेतात या’, असं व्हॉट्सअ्ॅप स्टेटस ठेवत शेतकऱ्यानी केली आत्महत्या

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीजवळील गाजलेल्या ‘त्या’ खूनप्रकरणातील कुख्यात गजानन मारणेची निर्दोष मुक्तता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या