बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमित मिश्राने सांगितला तो ‘मंत्र’ आणि दिल्ली कॅपिटल्सला भेटली महत्वाची विकेट

मुंबई | आयपीएलचा दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये हा सामना खेळला जात आहे. खराब सुरुवतीनंतर मोईन अली आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैना यांनी चेन्नईला सावरलं. याचवेळी वरिष्ठ खेळाडूनं दिलेला मंत्र दिल्ली कॅपिटल्सच्या कामी आला.

9 वी ओव्हर घेऊन अश्विन गोलंदाजी करायला आला. नंबर 3 वर खेळायला आलेल्या मोईन अलीने अश्विनला पाहिल्याच चेंडूवर लॉंग ऑनवर गगनचुंबी षटकार ठोकला. मोईन अली सुरुवातीपासून आक्रमकपणे खेळत होता.त्यामुळे दिल्लीच्या डगआऊटमध्ये चिंतेचं वातावरण होतं. त्यामुळे दिल्लीचा सर्वात वरिष्ठ खेळाडू अमित मिश्राने कर्णधार रिषभ पंतच्या कानात मंत्र सांगितला.

अश्विनने लगेच पुढचा बॉल टाकल्यावर या चेंडूलाही मोईन अलीने चेंडू सीमापार केला. सलग 2 चेंडूत मोईन अलीने 2 षटकार मारले. त्यानंतर रिषभ पंत अश्विनकडे गेला. मिश्राने सांगितलेल्या सूचना पंतने अश्विनला सांगितल्या. 9 व्या षटकातला तिसरा चेंडू अश्विनने टाकला. मोईन अलीने चेंडूला स्वीप केला. टाकलेल्या चेंडूला गती असल्याने तो उडाला आणि सीमारेषेच्या अलीकडे उभ्या असलेल्या शिखर धवनने तो अलगद पकडला.

दरम्यान, 2 वर्षानंतर आयपीएल खेळणाऱ्या सुरेश रैनाने पहिल्याच सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 12.5 षटकात चेन्नईच्या 111 धावा झाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

लॅाकडाऊनमुळं महाराष्ट्रातील ‘या’ खासदाराला मिळाला वेळ, मग काय थेट गहू कापायला घेतला!

इतक्या दिवसांचा असू शकतो महाराष्ट्रातील लॉकडाऊन, दोन दिवसात होणार निर्णय!

“मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा”; भर बैठकीत देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

नागरिकांनो तयारी ठेवा!; मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात मांडली ‘ही’ महत्त्वाची भूमिका

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे गैरहजर; अनुपस्थितीचे खरे कारण आले समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More