बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक खेळलेल्या ‘या’ खेळाडूने घेतला तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय !

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडूने स्टुअर्ट बिन्नीने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2016 पासुन बिन्नीने एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही.बराच काळ भारतीय संघापासुन बिन्नी लांब होता. देशांतर्गत क्रिकेटद्वारे बिन्नी भारतीय संघात परतण्याचा प्रयत्न करत होता. अखेर सोमवारी बिन्नीने निवृत्तीचा निर्णय घेतला.

स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला आहे. स्टुअर्ट बिन्नीने बांगलादेशविरूद्ध 4 धावा देत 6 फलंदाजाला माघारी धाडले होते. तो विक्रम अजूनही कोणत्याही भारतीय गोलंदाजांना मोडता आलेला नाही. स्टुअर्ट बिन्नी हा भारताचा माजी क्रिकटपटू रॉजर बिन्नींचा मुलगा आहे.

स्टुअर्ट बिन्नीने न्युझीलंडविरूद्ध एकदिवसीय सामन्यात 2014 साली आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. भारतासाठी 6 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यम वेगवान स्विंग गोलंदाज म्हणून बिन्नीने क्रिकेटची कारकीर्द गाजवली आहे.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये 194 धावा, एकदिवसीय सामन्यांमध्ये 230 धावा आणि टी-20 क्रिकेट सामन्यांत 35 धावा केल्या आहेत. मार्च महिन्यात बिन्नीने नागालॅंडकडून अरूणाचल प्रदेशविरूद्ध 55 धावांची नाबाद खेळी खेळली होती. बिन्नीचा 100 वा प्रथम श्रेणी सामना हा क्रिकेटमधील  शेवटचा सामना ठरला.

थोडक्यात बातम्या-

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! पुण्यातील ‘या’ बॅनरची चर्चा; पाहा व्हिडीओ

“मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय केंद्राचा, मोदींकडं साकडं घाला”

भर लग्नात नवरीचे ठुमके अन् वऱ्हाडी तर पाहतच राहिले; पाहा व्हिडीओ

सेन्सेक्सची नवी भरारी! सणासुदीला शेअर बाजार उच्चांकावर; गुंतवणूकदारांची चांदी

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून करता येणार ‘आयफोन 13’ची बुकिंग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More