बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाकिब बनला टी-20 वर्ल्ड कपचा नवा बादशहा! ‘या’ जागतिक विक्रमाची केली नोंद

नवी दिल्ली | विश्वचषकामधील अ गटमधील बांग्लादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये सामना झाला. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशने या निर्णयावर पाणी फेरलं आणि श्रीलंकेसमोर 171 धावांचं लक्ष्य दिलं. त्यानंतर गोलंदाजीला उतरलेल्या बांग्लादेश संघातील अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन ने टी-20 विश्वचषकमध्ये जागतिक विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

शाकिब अल हसन ने 8 व्या षटकामध्ये पथुम निसंका त्रिफळाचित केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अविष्का फर्नांडोलाही त्रिफळाचित करत टी-20 विश्वचषकामध्ये सर्वात जास्त 41 बळी घेत विक्रम केला आहे. हा विक्रम अगोदर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद अफ्रिदीच्या नावावर होता.

तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगाच्या 38 बळींची नोंद आहे. तर शाहिद अफ्रिदी 39 बळी घेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी-20 प्रकारातही सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम शाकिबच्या नावावर आहे.

दरम्यान, शाकिबची टी-20 प्रकारातील एका डावात 20 धावांमध्ये 5 बळी सर्वोत्त कामगिरी आहे. श्रीलंकेच्या सामन्यात शाकिबने 10 धावा काढल्या होत्या. तर शेवटचं वृत्त हाती लागल्यावर शाकिबने 3 षटकांमध्ये 17 धावा देत 2 बळी टिपले होते.

थोडक्यात बातम्या-

भारतीय संघाला रोखण्यासाठी शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला दिले भन्नाट सल्ले, धोनीला रोखा…

बाबर-रिझवान नव्हे, तर पाकचा ‘हा’ खेळाडू भारताला डोकेदुखी ठरू शकणार???

“आरोग्य विभागातील परिक्षेच्या गोंधळाला राजेश टोपेच जबाबदार त्यांनी राजीनामा द्यावा”

“…किंवा तू तरी गांजा मारून व्हिडीओ पोस्ट केलाय”

“मी तर आधीपासून सांगत आहे, राज्य सरकारनं आता तरी…”; नवाब मलिकांनी केली महत्वाची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More