बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील सर्व शाळा लवकरच सुरु होणार, हालचालींना वेग!

मुंबई | कोरोना महामारीच्या संकटामुळे जवळपास गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा केव्हा सुरु होणार, हा प्रश्न पालकांना पडला आहे. अशातच आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोरोनामुळे शाळांना लागलेली कुलूपे खोलण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे. कोरोनाचा धोका कमी झाला असल्याने राज्य सरकारने सध्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरु केले आहेत. उर्वरीत वर्ग देखील आता लवकरच सुरु होतील. पुढील आठवड्यात शिक्षण विभागाची यासंदर्भात एक बैठक आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. यानंतर राज्यातील 5947 शाळा सुरु करण्यात आल्याचा माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यात एकूण 19,997 शाळा आहेत. त्यापैकी 5,947 शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच 4,16,599 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी नोंदवली असल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान, आता सर्व शाळा पूर्ण क्षमतेनं केव्हा सुरु होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या –

काय सांगता! ट्विटरने चक्क महेंद्रसिंह धोनीची हटवलेली ‘ब्लू टीक’ पुन्हा दिली

भाजप आणि मनसेची युती होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, NIT इंजिनिअरिंग कॉलेजवर ईडीची छापेमारी

जनसामान्यांची लोकल सेवा सुरू करण्याबाबत भाजप मैदानात, मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलन

मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते पण…- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More