बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा ‘या’ तारखेपर्यंत बंदच राहणार!

पिंपरी-चिंचवड | कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंदच आहे. अशावेळी मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे.

ज्या गावांमध्ये एक महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही अशा गावांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  राज्यातील काही जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे शहरातील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंदच राहणार असल्याची माहीत पालिका आयुक्तांनी आज दिलीय. त्यामुळे उद्योगनगरीतील मुलांना अद्यापही ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं पाहायला मिळत आहे.  पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंद राहणार असल्याचं परिपत्रक पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे.

कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी विकेंड लॉकडाऊन सुरु आहे. परंतु नागरिकांना याचं कसलंही भान राहिलं नाहीय. लॉकडाऊन असून देखील नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर आजपासून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर…’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची खुली ऑफर

“शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करु, म्हणणाऱ्या अण्णांची फडणवीसांच्या भेटीनंतर भूमिका बदलली”

अनिल देशमुखांच्या मालमत्ता जप्तीनंतर काँग्रेसचे थेट ‘ईडी’ला प्रश्न

‘कुणी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचं तर कुणी कमरेवर हात ठेवायचं’; भारतीचा धक्कादायक खुलासा!

महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, पण धोका अद्याप टळलेला नाही! 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More