मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना रोज नवे नवे हादरे बसत आहेत. ज्यांना जायचं त्यांनी जावं, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. शिवसेनेची (shivsena) गळती अजूनही चालू आहे. शिवसेनेच्या गटातून माजी खासदार आंनदराव अडसूळ यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
ठाण्यातील सर्व माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या सर्व नगरसेवकांची संख्या 66 इतकी आहे. त्यामुळे ठाण्यातील अर्ध्यापेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठ खिंडार पडलं आहे. यामुळे येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान आहे.
हे सर्व 66 नगरसेवक एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते. माजी महापौर नरेश मस्के यांचाही यात समावेश आहे. आपला पाठिंबा शिंदे यांना असल्याचं 66 नगरसेवकांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचा आता एकही नगरसेवक ठाण्यात राहिला नाही. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा शब्द सर्वस्व मानला जातो. मुंबईप्रमाणेच ठाणे महानगरपालिकाही शिवसेनेसाठी तितकीच महत्त्वाची आहे.
शिवसेनेची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. येणारी निवडणूक ठाकरे सरकारसाठी आवाहानात्मक असणार आहे. या दरम्यान ठाकरे सरकारचं भवितव्य धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदे आज पदभार सांभाळतील.
थोडक्यात बातम्या
शरद पवारांचं कौतुक नाही करायचं तर कोणाचं करायचं?’; राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला
काळीज पिळवटून टाकणारी घटना; 6 वर्षाच्या चिमुकल्याने आईच्या डोळ्यादेखत जीव सोडला
शिवसेनेला आणखी एक झटका; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
मुंबईकरांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
धक्कादायक! हॉटेलमध्ये पोळी लाटताना कर्मचाऱ्याने केलं ‘हे’ कृत्य
Comments are closed.