Top News कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यातील सर्व दुकाने उघडण्यास मुभा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई |   राज्य सरकारने दुकाने आणि आस्थापने उघडण्यास आता मुभा दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन असल्याने दुकाने आणि आस्थापना बंद होते. मात्र आता शासनाने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत ही दुकानं सुरू राहणार सुरू राहण्यासंबंधीची परवानगी दिली आहे. सरकारने एक परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील दुकाने आजपासून सुरू होण्याची चिन्ह आहेत.

राज्य सरकारने जरी परवानगी दिली असली तरी जिल्हा प्रशासनाला याबाबतचे अंतिम निर्णय घेता येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची कोरोना परिस्थिती पाहून ते ते जिल्हा प्रशासन आपल्या जिल्ह्यात परवानगी द्यायची की नाही, हे ठरवू शकतं. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार असेल.

शासनाने दुकाने जरी सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. सध्या ग्रीन झोनमधली दुकाने उघडण्यास हरकत नाही. ऑरेंज झोन आणि रेड झोनबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतं ते पाहणे महत्त्वाचं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना

महत्वाच्या बातम्या-

पाहा पुण्यात किती रूग्ण सापडले? तर किती रूग्णांना ठणठणीत होऊन घरी सोडलं…

मुंबईतील सर्व सवलती रद्द; मुंबईकरांच्या बेशिस्तपणामुळे आयुक्तांचा निर्णय

गुडन्यूज… राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोना बाधितांना घरी सोडलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या