बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व दुकानं उद्यापासून बंद, पण ‘या’ 4 वस्तूंची दुकानं राहणार उघडी

पुणे| कोरोनानं राज्यभर धुमाकूळ घातला आहे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात पुणे शहराला बसला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरीतील सर्व दुकानं उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाकडून घेण्यात आला आहे.

बाजारपेठेतील मेडीकल, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 16 वर पोहोचली असून राज्यात 139 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. पुण्यातही 144 कलम लागू करण्यात येणार आहे. पण यात संचार बंदी नसेल अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. तसंच ज्या खासगी कंपन्यांना शक्य आहे त्या कंपन्यांनी कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्याचे, आदेश देण्यात आले आहेत.

सर्वांना काळजी घेण्याचं त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी रोजच्या वापरात नोटांचा वापर टाळून डीजिटल व्यवहार करावेत, अशा सूचना रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिल्या आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

तुला मला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीचं गोंडस उत्तर, पाहा व्हिडीओ

“आम्ही उपाशी आहेत की नाही हे जनता ठरवेल मात्र तुम्ही नेहमी कुपोषित दिसता”

महत्वाच्या बातम्या-

कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकारने घेतेलले 11 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

“चंद्रकांतदादा जरा जपून बोला नाहीतर तुम्हाला तुमची उंची दाखवावी लागेल”

कोरोनामुळं कोणती पर्यटन आणि धार्मिक स्थळ बंद असतील; जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More