Top News कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील सर्व संशयितांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला मोठा निर्णय

पुणे | पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्याही वाढतं आहे. ही परिस्थीती आटोक्यात येण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील संशयित रुग्णांची कोरोना चाचणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रोजेश देशमुख यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात टप्याटप्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून संशयित आढळलेल्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितलं आहे. तसेच या मोहिमेचा उद्दिष्ट कोरोनाबाबतीत लोकांना शिक्षित करणे हा आहे. कोरोनाबाधित रुग्ण शोधून त्याच्यावर लवकर उपचार करणे, जेणेकरुन मृत्यूदर कमी होईल, असही डॉ. देशमुख म्हणाले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 14 सप्टेंबर म्हणजेच सोमवारी या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यायाठी बैठक घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यक्ती आणि कुटुंब केंद्रबिंदू मानून नागरिकांनी अंतर राखावे  मास्कचा वापर करणे आणि वारंवार हात धुणे, या त्रिसूत्रीचा सर्वांनी अवलंब करावा, असं डॉ. देशमुख यांनी बैठकीत सर्वांना सांगितलं आहे.

दरम्यान, ही मोहिम लोकप्रतिनीधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया, असं अवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे”

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा गेला एक लाखांच्या वर

आग्र्यातील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यावर फडणवीस म्हणाले…

“गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का केली नाही?

आग्र्यातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव- योगी आदित्यनाथ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या