Top News महाराष्ट्र मुंबई

“आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?”

मुंबई | शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीस दिलं जाईल, असे सकपाळ यांनी सांगितलं. या मुद्द्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडा खांद्यावर घेणं बाकी राहिलं आहे, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

ट्विटमध्ये भातखळकर लिहितात, “शिवसेनेवर टीका केली तर उत्तर द्यायला शिवसेना नेते नसले तरी काँग्रेसवाले तात्काळ हजर असतात. भ्रष्टाचाराबाबत दोन्ही पक्ष एकमेकाला वरताण आहेत, फरक फक्त भगव्यामुळे होता.”

दरम्यान, शिवसेनेने भगवा गुंडाळल्यानंतर शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“चुरस आहे पण विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू, पुणे तर वनवेच”

लव्ह जिहाद व जबरदस्तीने धर्मांतर कायद्याबाबत पुनर्विचार करा- मायावती

“मला सत्ता हा विषय गौण असून भाजपच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली हे जाहीर कराच”

“कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही”

लहानपणी माझंही लैंगिक शोषण झालं; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या