बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुजरातमध्ये संपुर्ण मंत्रिमंडळच बदललं, विजय रूपाणींच्या सगळ्याच मंत्र्यांना नारळ 

नवी दिल्ली | गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशातच विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे गुजरातमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुजरातचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून होतं. भाजपने अखेर भुुपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. आज मोठ्या दिमाखदार सोहळ्यात भुपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु पटेल यांच्या नवीन मंत्रीमंडळात विजय रूपाणी यांच्या मंत्रीमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात न आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भुपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात एकूण 24 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 10 जणांना कॅबिनेट मंत्रिपद तर 14 जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. परंतु नवीन मंत्रिमंडळात विजय रूपाणी यांच्या मंत्रिमंडळातील 24 मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे गुजरात भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर विधानसभेच्या अध्यक्षपदी निमा आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्या मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी 04:30 वाजता घेण्यात आली आहे. तर कॅबिनेट मंत्री म्हणून राजेंद्र त्रिवेदी, जितेंद्र वघानी, ऋषिकेश पटेल, पूर्णश कुमार मोदी, राघव पटेल, उदय सिंह चव्हाण, मोहनलाल देसाई, किरीट राणा, गणेश पटेल, प्रदीप परमार, या नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली.

दरम्यान, भुुपेंद्र पटेल यांच्या नवीन मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून हर्ष सांघवी, जगदीश ईश्वर मेरजा, जीतू चौधरी, मनीषा वकील, मुकेश पटेल, निमिषा बेन, अरविंद रैयाणी, कुबेर ढिंडोर, कीर्ति वाघेला, गजेंद्र सिंह परमार, राघव मकवाणा, विनोद, मरोडिया, देवा भाई मालव या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.  पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा बुधवारी होणार होता. मात्र नव्या मंत्रिमंडळावर रूपाणी आणि नितीन पटेल नाराज होते.

थोडक्यात बातम्या-  

महाविकास आघाडी सरकार पडणार? चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा रद्द; आलं ‘हे’ मोठं कारण समोर

पोस्ट ऑफिसमध्ये ‘हे’ खातं असेल तर मिळेल 2 लाखांचा फायदा!

पुरुषोत्तम खेडेकरांच्या युतीच्या भूमिकेवर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया!

‘बिग बाॅस मराठी 3’ मध्ये झळकणार हे कलाकार?, संभाव्य नावं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More