बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कारवाई करा- राज्यपाल

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ 23 जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणं, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी म्हटलंय.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांना एक पत्र लिहिलं आहे. पत्रातून त्यांनी उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष निवडीची आठवणही करुन दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे तीन मागण्या केल्या. सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. मात्र जास्तीत जास्त कालावधीचं अधिवेशन घ्यायला लावावं, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

अध्यक्षपद रिक्त ठेवण हे संविधानाच अवमुल्यन करण्यासारखं आहे. महाराष्ट्रात संविधानिक कारभार होत नाही हे तुम्ही राष्ट्रपतींना कळवा, अशी मागणी फडणवीस यांनी राज्यपालांकडे केलीय. तसेच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आगामी निवडणुका पुढे ढकला, अशी विनंती फडणवीसांनी राज्यापालांना केल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या- 

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलैचा दुसरा आठवडा महत्त्वाचा, शिक्षणमंत्र्यांनी सांगितली निकालाची तारीख!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; करून दिली ‘ही’ आठवण

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ‘भारत बायोटेक’ला मोठा फटका; इतक्या कोटी डॉलर्सचा करार स्थगित

“शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही मानत असाल तर…”

तासाभरात होत्याचं नव्हतं झालं; रिमोटची बॅटरी गिळल्याने अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More