बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांनी परप्रांतियांच्या कानाखाली मारली त्यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ म्हणू नये”

जळगाव | मुंबईत शिवसेना भवनासमोर मनसेने बॅनरबाजी केली आहे. गर्व से कहो हम हिंदू है, अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स लावून मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून शिवसेना नेते तसेच  राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.

जे स्वत: स्टेबल नाहीत त्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणू नये, असा टोला गुलाबराव पाटील यांनी मनसेला लगावला आहे. मनसेच्या स्थापनेवेळी सर्व धर्म समभावचा नारा दिला होता परंतू त्यांनी नंतर परप्रांतियांच्या कानात मारली आणि झेंडा बदलला, असा निशाणा गुलाबराव पाटील यांनी मनसेला लगावला आहे.

मराठीच्या मुद्यावरून देखील त्यांनी मनसेवर टीका केली आहे.पुन्हा मराठीपणा आणला आणि परप्रांतीयांच्या कानाखाली मारली. आज जे म्हणतायत गर्व से कहो हम हिंदू है, मात्र गर्व से कहो हम हिंदू है, असं आमचे बापजादे म्हणतं होते. ही सर्व शिवसेनेचीच पिलावळ आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीबाबत भाष्य केलं आहे. इथे जर एकमत होत नसेल तर सर्व पक्ष वेगळे लढतील, असं त्यांनी म्हटलं आहे. जिल्हा बँकेची निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेची स्वबळाची तयारी आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. तसेच बँक अ वर्गात ठेवायची असेल तर निवडणूक बिनविरोध होण्याची गरज आहे, असंही गुलाबराव पाटीलांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

IPL 2021चा चॅम्पियन कोण? फायनलमध्ये ‘या’ 8 खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

“आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना”

“महाराष्ट्राच्या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचं आज दहन करणार”

ट्विटरवर होतोय ‘आज का रावण नरेंद्र मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड’; तब्बल एवढ्या लोकांनी केलंय ट्विट

“आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More