बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“30 हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं सुरू आहे”

मुंबई | राज्यातील वातावरण सध्या ड्रग्ज आणि एनसीबी यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. ड्रग्ज प्रकरणानं राज्यासह देशात खळबळ उडाली असताना या प्रकरणावरून एनसबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यशैलीवर राज्य सरकारनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. परिणामी सध्या समीर वानखेडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतूरा रंगला आहे. अशातच राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे.

काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या बंदरात जवळपास 3000 किलो ड्रग्ज सापडल्यानं देशभर एकच खळबळ उडाली होती. मात्र त्याची देशात चर्चा नाही तर एनसीबीच्या बोगस कारवाईची चर्चा देशात आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. गुजरातमधील 30 हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं करण्यात येत आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

2 ग्रॅम, 5 ग्रॅम ड्रग्जची चर्चा करून महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम चालू आहे. तसेच या ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीर मिळाला आहे तर त्याचा तपास कायद्याच्या विरोधात केल्यामुळं तपास अधिकारी अडचणीत सापडला आहे, असा टोला भुजबळ यांनी समीर वानखेडे यांना लगावला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप सरकार गैरवापर करत आहे, अशी घणाघाती टीका भुजबळ यांनी केली आहे.

दरम्यान, जगातील सर्वात मोठी ड्रग्ज तस्करी गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर पकडण्यात आली होती. यावरून भाजप सरकारवर आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर देशभरातून जोरदार टीका झाली होती. राज्यात ड्रग्ज प्रकरणावरून सध्या जोरदार राजकीय फटकेबाजी चालू आहे.

थोडक्यात बातम्या 

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल देशमुखांना दणका

आर्यन खानची आज आर्थर रोड जेलमधून सुटका होणार का? वकिल मानेशिंदे म्हणतात…

शहनाजने सिद्धार्थला दिला ट्रिब्यूट; ‘या’ खास गाण्यातून वाहिली श्रद्धांजली

“बाळासाहेब नसले तरी उद्धव ठाकरे आहेत, सरकार कोणावरही अन्याय करणार नाही”

टेनिस कोर्टातून थेट राजकीय मैदानात! लिंएडर पेसचा तृणमूलमध्ये प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More