बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी नशीबवान आहे, माझी मुले ड्रग्स घेत नाहीत, त्यांनी अद्याप…”

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून मुंबईतील कथित क्रूझ ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. एनसीबीने क्रूझवर धडक कारवाई करत बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या अन्य साथीदारांना अटक करण्यात आली होती. मात्र आर्यन खानला 26 दिवसानंतर जामीन मिळाला आहे. आता या सर्व प्रकरणावर उलटसुलट प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यातच आता यावर काँग्रेस नेते आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी नशीबवान आहे की, माझी मुले ड्रग्स घेत नाहीत. माझी तीनही मुलं गुणवान आहेत. त्यांनी अद्याप कोणत्याही मादक पदार्थ्यांचे सेवन केलेलं नाही, अशी प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी मागील काही दिवसांपूर्वी आर्यन खान प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, एनसीबीने कारवाई केलेल्या क्रूझ प्रकरण हे अतिशोयोक्तीपूर्ण वाटत आहे. तसेच यामध्ये काही गोष्टी रंगवून सांगितल्या जात आहेत, असं सिन्हा यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, मला वाटतं की, हे सर्व आर्यन खान प्रकरण पूर्णत:हा खोटं आहे. तसेच आर्यन खानजवळ कोणतंही ड्रग्स सापडलं नाही, असं त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यातच आता त्यांच्या या नवीन प्रतिक्रियेमुळं त्यांच्या वक्तव्यामध्ये तफावत असल्याचं जाणवत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब, माझ्या अंगावर कोणी आलं तर…”

याला म्हणतात झटपट निकाल! कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने घेतले शिंगावर; पाहा व्हिडीओ

“2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर…”

केंद्र सरकारची दिवाळी! जीएसटी संकलनात तब्बल ‘इतक्या’ कोटींची वाढ

भारताच्या पराभवाचा पाकड्यांना आनंद! लाईव्ह कार्यक्रमात वसिम-वकार नाचले; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More