बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरूच असते. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आले आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यांनी मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोना वाढल्याचं कारण राज्य सरकारकडून दिलं जात असल्याचंही ते म्हणाले. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी भाजपसोबत पुन्हा युती करण्याची मागणी केली होती. यावरून शिवसेना आणि भाजप युतीबाबत देवेंद्र फडणविसांना विचारण्यात आलं. त्यावेळी देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत. हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शिवसेना-भाजप युतीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

विजय शिवतारेंच्या मुलीचे खळबळजनक आरोप, फेसबुक लाईव्हद्वारे आईचं प्रत्युत्तर

तिसऱ्या लाटेसाठी परळीकर सज्ज, एकही मृत्यू होऊ देणार नाही-धनंजय मुंडे

दिल्लीत नेमकं शिजतयं तरी काय? ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीआधी चर्चेला उधाण

भावांकडून वडिलांचा छळ, विजय शिवतारेंच्या मुलीच्या फेसबुक पोस्टनं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More