‘वर्षभरात देशातील सर्व टोल हटवणार’; नितीन गडकरींची मोठी घोषणा!
नवी दिल्ली | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत आज एक मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके हटवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. टोल हटवणे म्हणजे नागरिकांना टोलपासून मुक्ती मिळेल असा अर्थ नसून फक्त टोल नाके बंद होतील. परंतु, महामार्गावर द्याव्या लागणाऱ्या करापासून मुक्तता होणार नाही.
टोलनाके हटवून जीपीएस प्रणालीद्वारे गाडीने जेवढा प्रवास केला तेवढाच टोल आता नागरिकांना भरण्याची मुभा मिळणार आहे. नितीन गडकरींनी बसपा खासदार कुंवर दानिश आली यांनी टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर उत्तर दिलं. मागच्या सरकारने मलई खाण्यासाठी छोटे-छोटे टोल उभारले असल्याचाही आरोप त्यांनी केला.
शहरांच्या हद्दीवर टोल असणं अत्यंत चुकीचं असल्याचं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखवलं. गडकरी हे कायमच काही ना काही नवीन प्रयोग करत असतात आणि त्यांचे बहुतांश प्रयोग हे यशस्वी देखील झाल्याचं पाहायला मिळतं. तंत्रस्नेही असलेल्या नितीन गडकरींनी घोषणा केल्याप्रमाणे रशियन तंत्रज्ञानाचा उपयोग करून येत्या दोन वर्षात संपूर्ण देश टोलनाक्यापासून मुक्त होणार आहे. तसेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमद्वारे महामार्गावर प्रवेश करतेवेळी गाडीचा एक फोटो घेतला जाईल आणि महामार्ग सोडताना एक फोटो घेतला जाईल त्याद्वारे जेवढा प्रवास आपण केला असेल तेवढेच पैसे आपल्या बँक खात्यावरून टोल स्वरूपात वजा करण्यात येतील.
टोल बंद केल्यानंतर रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपन्या सरकारकडे भरपाई मागतील. पण पुढील वर्षभरात आम्ही फक्त टोलनाके हटवण्याची योजना आखली असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. अशा प्रकारचं तंत्रज्ञान सध्या विकसित करण्याचे काम सुरू आहे आणि लवकरच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास लोकसभेत गडकरींनी व्यक्त केला.
थोडक्यात बातम्या –
सुर्यकुमारला संधी का दिली नाही हे मला कळलं नाही – गौतम गंभीर
न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले बोल्ड फोटो!
भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचं कोरोनामुळे निधन!
अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला ‘तो’ शब्द पाळला!
उद्योजक-व्याख्याते शरद तांदळे यांच्या ‘या’ व्हिडीओमुळे वारकरी संतप्त, पाहा व्हिडीओ
Comments are closed.