बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षेबाबत उदय सामंत यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकने कडक निर्बंध लागू केले आहेत. सरकारने हे लागू केलेले नवे निर्बंध 1 मे पर्यंत लागू असणार आहेत. यामध्ये संचारबंदीचाही समावेश आहे त्यामुळे व्यवसायांसोबत परीक्षांचे नियोजनही विस्कळीत होण्याची शक्यता होती. मात्र परीक्षांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

कोविडच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते निर्णय घेतलाय की महाराष्ट्रातल्या सर्व 13 अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितंल आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होतेे.

परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती मी सर्व 13 विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे, असंही उदय सामंत यांनी सांगितलं. यावोेळी त्यांनी प्राध्यापकांच्या भरतीबाबतही चर्चा झाली असल्याचं सांगत  प्राध्यापकांच्या भरती केव्हा होणार याबाबत माहिती दिली.

दरम्यान, प्राध्यापकांच्या भरतीबाबत चर्चा झाली. प्राध्यापक भरती करायची आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल. प्राध्यापक भरती होणारच नाही, अशा ज्या चर्चा सुरु आहेत त्यावर विश्वास ठेवू नये, असं सामंत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

रक्तातील ॲाक्सिजनची पातळी कशी वाढवावी?, ‘या’ सोप्या गोष्टी नक्की करुन पाहा

पहिल्या लसीचा डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यायचा? तज्ज्ञ म्हणतात…

‘घरात रहा म्हणून सांगत होतात मग ते तुम्ही का नाही पाळलं?’; भाजप प्रवक्त्यांचा मोदींना सवाल

धक्कादायक! घरातून बाहेर पडण्यासाठी पुणेकर देत आहेत ही हास्यास्पद कारणं

महाराष्ट्रातील राज्य परिवहन वाहतुकीबाबत परिवहन मंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More