बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

योगी आदित्यनाथांनी शिवी दिल्याचा आरोप; ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या एका व्हिडीओमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर योगींचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत होते. मात्र, त्याचदरम्यान काही कारणांवरून चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. योगींनी अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर ते ‘एएनआय’शी बोलत होते. प्रतिक्रिया देत असतानाच कॅमेरा हलल्याने योगी आदित्यनाथ चिडले आणि त्यांनी कॅमेरामनला शिवी दिल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सेवानिवृत्त ‘आयएएस’ अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा आहे खरा चेहरा. संताची भाषा ऐका”, असं सूर्य प्रताप सिंह यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा आहे खरा चेहरा. थोडा आवाज झाला म्हणून ‘एएनआय’च्या कॅमेरामनला शिवी देत आहे. असो ‘एएनआय’सोबत असंच व्हायला हवं. देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था जेव्हा सरकारी प्रवक्त्यांपेक्षाही जास्त पुढे पुढे करते तेव्हा असं होणं साहजिक आहे, असं सूर्य प्रताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘एएनआय’ने तो डिलीट करत सुधारित व्हिडीओ पोस्ट केला आहे. आधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या थेट प्रतिक्रियेचा व्हिडीओ मागे घेण्यात आला आहे. या व्हिडीओत योगी आदित्यनाथ कोरोना लसीकरणासंदर्भात माहिती देत आहेत, असं ‘एएनआय’ने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका शब्दानेही बोलत का नाहीत?”

“संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी, सांगताही येत नाही अन्…”

उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही? ‘या’ बड्या नेत्यानं उपस्थित केला सवाल

आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ कडाडल्या

शरद पवार आपल्या खास मर्जीतील ‘या’ नेत्याकडे सोपवणार गृहमंत्रिपद?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More