बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेच्या पत्रातील आरोप खोटे, जनता दूधखुळी नाही- जयंत पाटील

मुंबई | सचिन वाझे प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजुर करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना भाजपवर टीका केली आहे.

एका अटक झालेल्या अधिकाऱ्याने किंवा आरोप असलेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहायचं आणि वाटेल तसे बेछूट आरोप करायचे आणि जिलेटीनच्या कांड्या ठेवण्याच्या अतिशय गंभीर आरोपात अडकलेले जे अधिकारी आहेत. त्यांच्या म्हणण्यावर आधारित आसा जर भाजप ठराव करत असेल तर भाजपवर वैचारिक दिवाळखोरी आलेली आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

ज्यांच्यावर गंभीर आरोप आहे. ज्यांच्यावर केंद्र सरकार एनआयए तपास करत आहेत. त्याच्यापासून येणारी पत्र आहेत. महाराष्ट्राची जनता दूधखुळी नाही. ती पत्र दबावाखाली लिहून घेतली आहेत अशी आमची खात्री असल्याचं पाटलांनी सांगितलं.

दरम्यान, काहीच हातात सापडत नाही यासाठी संशयाचं भूत निर्माण करण्यासाठी भाजप खालच्या पातळीवर उतरला आहे की, आता अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याचा ठराव कार्यकारिणीत चर्चा करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत तुमच्या कार्यकारिणीत चर्चा करा. तुमच्या काही अधिकाऱ्यांनी खोट्या आरोपांबाबत सीबीआयनं चौकशी करा अशी चर्चा होत असेल तर कार्यकारिणीला दुसऱ्या कोणती काम उरली नाहीत, असा टोला पाटलांनी लगावला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

मुंबईत कोरोनाचा पुन्हा उद्रेक?, सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, जाणुन घ्या आकडेवारी

“चंद्रशेखर बावनकुळेंनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांना तिकीटच दिलं नाही”

43 वेळा कोरोना पाॅझिटिव्ह! 72 वर्षीय आजोबांनी अशी केली कोरोनावर मात

राज्य सहकारी बँकेचा नफा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 14 टक्क्यांनी वाढला

11 वीच्या प्रवेशाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More