बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आईचे दूध पिलेले असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा”

जालना | काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. त्यांनतर खोतकर यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांच्या सांगण्यावरूनच ही छापेमारी झाली गंभीर आरोप केला होता. त्याचबरोबर दानवे यांच्यावर त्यांनी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. अशातच आता रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्यावर आरोप करून काहीही फायदा नाही. मी साधा माणूस आहे. त्यामुळे कोणाच्या आरोपामुळे मी विकासकामे करण्याचं थांबणार नाही. उलट माझ्यावर आरोप झाले की मी मोठा होतो, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. मी कालच गणपतीला प्रार्थना केली आहे की, माझ्यावर असेच आरोप होऊ दे, असं दानवे म्हणाले आहेत.

गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप चिकटलेला नाही. जर कुणाच्यात हिंमत असेल, आपल्या आईचं दूध पिलेलं असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, माझ्यावर जेवढे आरोप केले जातात तेवढा मी मोठा होत जातो, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. चारशे लोकसंख्या असलेला माणूस राज्यात आणि देशात राज्यमंत्री होऊ शकतो. एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते, असंही दानवे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“एक बाई उठते अन् तिला…”, बाळासाहेब थोरातांनी घेतला समाचार

Omicron वाढतोय, शाळा सुरू होणार का?; वर्षा गायकवाड म्हणतात…

शिवेंद्रराजेंना धक्का! शरद पवारांच्या एका मताने शिवेंद्रराजेंचा पत्ता कट

‘कुणी मायीचं दूध पिलेला असेल तर..’; रावसाहेब दानवेंचं विरोधकांना ओपन चॅलेंज

अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नातील ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More