औरंगाबाद | महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या कर्माने कोसळेल. हे शंभर टक्के सांगतो की महायुतीचे सरकार पुन्हा येईल. भारतीय जनता पक्ष हे सरकार पाडणार नाही. तर महाविकास आघाडीमधील लोकच हे सरकार पाडतील, असा विश्वास शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी बोलून दाखवला आहे. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी आहे. फक्त राष्ट्रवादी पक्षाचे आमदार नाराज होवून राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. इतकचं नाही तर ज्यांनी सत्ता येण्यासाठी शिवसेनेकडून खिंड लढवली ते खासदार संजय राऊतच मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेतेही उपस्थित नव्हते, असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नाराज आमदार राजीनामा देत आहेत. “ये तो अभी झाकी है पूरा पिच्चर अभी बाकी है’ शेवट काय होणार आहे हे जनतेला माहीत आहे, अशा शब्दात मेटे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली.
लोकमताचा आदर ठेवून प्रकाश सोळंके यांनी राजीनामा देवू नये. स्वर्गीय सुंदराव सोळंकेचा वारसा सक्षमपणे चालवत आहेत. राष्ट्रवादीची नाराजी वाढवावी. पण राजीनामा देवू नये, असा सल्लाही मेटेंनी सोळंके यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“राहुल गांधी मुर्ख नाही तर महामुर्ख आहेत” – https://t.co/4VhlFatwRa@RahulGandhi #NRC
— थोडक्यात (@thodkyaat) December 31, 2019
केंद्र सरकारच्या जुलमाच्या कारभारामुळे देशाचं 21 हजार कोटींचं नुकसान- राष्ट्रवादी – https://t.co/MK0Kihcmfo @NCPspeaks @PawarSpeaks @narendramodi @BJP4Maharashtra #म
— थोडक्यात (@thodkyaat) December 31, 2019
उद्धवा, अजब तुझे सरकार!; किरीट सोमय्यांचं शिवसेनेवर टीकास्त्र – https://t.co/7OxjPxqcv9 @KiritSomaiya @OfficeofUT @ShivSena @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) December 31, 2019
Comments are closed.