Top News आरोग्य

देशातील अॅलोपथी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन

मुंबई | देशभरातील डॉक्टरांनी आज बंद पुकारलाय. आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास दिलेली परवानगी मागे घेण्याच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आलाय.

केंद्र सरकारने ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ पदव्युत्तरांना डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. मात्र आयुर्वेद हे फक्त कफ, वात, पित्त अशा भिन्न विचाराच्या संकल्पनांवर आधारित असून याची तुलना आधुनिक वैद्यकशास्त्राशी करता येणार अशी भूमिका आयएमएने मांडली आहे.

यासंदर्भात ‘थोडक्यात’शी बोलताना महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र आयएमचे सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, आयुर्वेदाच्या डॉक्टरांना परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये राज्यातील जवळपास 45 हजार डॉक्टरांचा समावेश आहे. शिवाय इतर वैद्यकीय संघटनांचा देखील या बंदला पाठिंबा आहे.”

राज्यभरातील सर्व खासगी दवाखाने तसंच रुग्णालयातील ओपीडी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद ठेवली आहेत. आपात्कालीन सेवा मात्र सुरू राहणार असल्याचं आयएमएकडून सांगण्यात आलंय.

थोडक्यात बातम्या-

गायिका कार्तिकी गायकवाडचं शुभमंगल सावधान; पाहा लग्नातील निवडक फोटो

नवनीत राणांचं रावसाहेब दानवेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

सध्या राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती…- संजय राऊत

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, नाही तर…- नाना पटोले

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून दानवेंची पाठराखण, म्हणाले…

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या