बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरसकट 9 ते 6 दुकानं उघडायला परवानगी द्या अन्यथा…

कोल्हापूर | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने आता अनलॉकला सुरुवात झाली आहे. उद्यापासून महाराष्ट्रातील अनलॉकच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. तसेच टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्हा अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात असल्यामुळे येथील व्यापारी संतप्त झाले आहेत. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत सरसकट सर्व दुकानं उघडायला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीचा विचार करून परवानगी द्यावी, अन्यथा कोणत्याही क्षणी सर्व व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा सज्जड इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने दिला आहे. सध्या कोल्हापूरमध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, व्यापाऱ्यांना ही वेळ आणि नियम जाचक वाटत असल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोल्हापूरमध्ये व्यापारी विरुद्ध जिल्हा प्रशासन असा वाद पेटण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. त्याबरोबरच जिल्हा प्रशासन या मागणीवर नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

पुणेकरांनो विनाकारण गर्दी करू नका, अन्यथा…- अजित पवार

सकारात्मक बातमी! देशातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 15 लाखांच्या खाली

त्यांना कामधंदा नाही म्हणून ‘ती’ गोष्ट उकरून काढताहेत- अजित पवार

सोमवारपासून पिंपरी-चिंचवडमध्ये नवे नियम होणार लागू; काय सुरू, काय बंद? वाचा एका क्लिकवर

“…म्हणून नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणं अयोग्य”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More