मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कडक नियम तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे.
कोरोनामुळे शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशात जालन्यातील एका इंग्रजी शाळा असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून एक अजब मागणी केली आहे. कोरोना संपेपर्यंत शाळेत डान्सबार, लॉज, मद्यविक्रीची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.
लॉकडाऊनमुळे संस्थाचालक त्रस्त झाले असून अशावेळी पैसे कमवण्यासाठी शाळांमध्ये डान्सबार, लॉज, गुटखा आणि सिगारेट विक्री आणि मद्यविक्रीची तात्पुरत्या स्वरुपाची परवानगी द्या, असं पत्र इंग्रजी शाळा असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. यातून राज्य सरकारला भरभक्कम महसूल मिळेल, असंही या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, 1 मार्च जवळ आल्याने बँकेच्या अधिकारी शालेय इमारतीसाठी व इतर बाबींसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी रोज शाळेत येऊन संस्थाचालकांच्या कुटुंबावर कारवाई करण्याचं आणि मालमत्ता जप्त करण्याच्या नोटीसा पाठवत आहेत. जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत, असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोनामुळे ‘या’ राज्यातून महाराष्ट्रात जाण्या-येण्यावर निर्बंध; बससेवा केली बंद
मुंबईकरांनी भारतीय संघाला सावरलं, अटीतटीच्या सामन्यात भारताचा इग्लंडवर विजय
“युपीएचं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा”
शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी- राकेश टिकैत
पुण्यात लुटमारीसाठी दुकानदारावर गोळीबार; पोलिसांनी रचला सापळा आणि…
Comments are closed.